• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Thursday, 18 December 2014

1

श्रीसर्वतोभद्र कुंभ यात्रा

Posted in

सर्वतोभद्र कुंभ यात्रा, कृपा, काशी विश्वेश्वर यात्रा, तीर्थस्थान, तीर्थ यात्रा, आशीर्वाद, श्री हरिगुरूग्राम, अवधूतचिंतन

महत्व - 
भारतीयांच्या मनात हजारो वर्षांपासून एक अतिशय सुंदर ध्येय असते, ते म्हणजे 'श्रीसर्वतोभद्र कुंभ यात्रा'. म्हणजे काय तर काशीला जाउन तेथील गंगेचे पाणी कावडीत भरून रामेश्वराम्ला जायचे आणि त्या रामेश्वराच्या लिंगावर अभिषेक करायचा आणि रामेश्वरम् जवळील कन्याकुमारीचे पाणी अर्थात तीन समुद्र एकमेकांना मिळतात, त्या जागेवरून आणून ते काशीविश्वेश्वराला वाहायचे. याच यात्रेला 'श्रीसर्वतोभद्र कुंभ यात्रा' म्हणतात. गेली हजारो वर्षे प्रत्येक वैदिक मन, भारतीय हिंदू मन ही यात्रा करण्यासाठी धडपडत असते. सर्वतोभद्र म्हणजे सर्वतोपरी कल्याण करणारी यात्रा. 
काशीविश्वनाथ- 'नाथ' हा शब्द नेहमी विष्णुसाठी वापरला जातो; तर रामेश्वर - 'ईश्वर' हा शब्द नेहमी शिवासाठी वापरला जातो. परंतु विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे. काशीविश्वनाथाचे अर्थात गंगेचे पाणी त्या रामेश्वरम् ला वाहायचे; तर कन्याकुमारी, जी त्या शिवाची वाट बघत, त्याची आराधना करत त्या शिवातच विलीन झालेली भक्त, तेथील तीन समुद्रांच्या संगमाचे पाणी त्या काशीविश्वनाथाला वाहायचे. हीच ती जिवाशिवाची भेट आहे. 
कालीमाता बोले संगे बोले कन्याकुमारी ही 
अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरू एकमुखी । 
ती अन्नपूर्णा म्हणजेच शिवाची अर्धांगिनी. 
कन्याकुमारी म्हणजेच जिवाशिवाला जोडणारा सेतू, तर कालीमाता म्हणजेच साक्षात महिषासुरमर्दिनी, ह्यांची ही यात्रा आहे. म्हणूनच ती सर्वतोपरी कल्याण करणारी आहे आणि म्हणूनच येथील प्रदक्षिणेचा मार्ग नामाकृती आहे. 

रचना:
ह्या सर्वतोभद्र कुंभ यात्रेमध्ये एकीकडे श्रीकाशीविश्वेश्वर येथील गंगेच्या पाण्याचा जलाशय होता. त्याच्याशेजारीच श्रीकाशीविश्वेश्वराचा फोटो व त्याच्यापुढे त्याचे शिवलिंग ठेवलेले होते. तर दुसरीकडे श्रीरामेश्वरम् येथील पाण्याचा जलाशय व त्याच्याशेजारी श्रीरामेश्वराचा फोटो व शिवलिंग ठेवलेले होते. 
ही यात्रा करणाऱ्या श्रद्धावानांना एक कावड दिली गेली. त्यांनी ही कावड गंगेच्या पाण्याने भरून घेऊन व नामप्रदक्षिणा करून त्या पाण्याचा रामेश्वराला अभिषेक घातला व हा अभिषेक करताना 'पार्वतीपते हर हर महादेव' हा गजर करण्यात आला. 

पुण्यफल:
शिवाची वाट बघत, त्याची आराधना करत कन्याकुमारी ही भक्त त्याच्यातच विलीन झाली, एकरूप झाली. ही यात्रा माझ्या जिवाशिवाचे मीलन करणारा असाच एक सेतू होती. ही यात्रा करताना कावडीत पाणी घेऊन त्या शिवशंकराला अभिषेक घालताना श्रद्धावानांचे शरीर कष्टावले, त्या मनाला बुद्धीप्रमाणे वागायला लावले  व तिथेच श्रद्धावानांच्या जिवाशिवाचे मीलन झाले. जिवाशिवाचे मीलन म्हणजेच माझ्या मनाला पवित्र बुद्धीच्या आज्ञेने घडवणे, बदलवणे, वागायला लावणे. ह्या यात्रेने  श्रद्धावानांना विवेक प्रदान केला. जीवनात शुभ, हितकारक गोष्टी करून जीवन सुखमय आनंददायी बनवण्यासाठी अशुभ अहितकारक गोष्टींचा नाश करायला हा विवेक आम्हाला शिकवतो, ती सद्सद्विवेकबुद्धी प्रदान करतो. 

* ह्या कुंभयात्रेने आमच्या मनातील भूतकाळाचे - भूतांचे भय कमी होते.

1 comment:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध