• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Friday, 9 January 2015

0

श्रीदत्तयाग

Posted in
 
अवधूतचिंतन, आशीर्वाद, दत्तात्रेय, गुरूदेव, दत्तगुरू, दत्तजयंती, श्री हरिगुरूग्राम, जोतिर्लिंग, कुंभयात्रा, दत्तयाग


महत्व :
तीन दिवस चालणारा हा दत्तयाग म्हणजे साधासुधा होम अथवा यज्ञ नव्हता, तर ही अतिशय सुंदर घटना होती. ह्या यागासाठी गेली तीन वर्षे एकूण अकरा व्यक्ती अनुष्ठान करीत होते. त्या व्यक्तींचे हे विशिष्ट अनुष्ठान विशिष्ट वेळेला उठून पूर्ण झाले आणि म्हणून हा दत्तयाग केला गेला होता. 

श्रीगुरुक्षेत्रम् येथील श्रीपुरुषार्थ क्षमादान यंत्र, श्रीदत्तगुरूंची एकमेव अद्वितीय तसबीर, एकमेव अव्दितीय असे धर्मासन ह्यांची एकत्रित प्रातिनिधिकता व बल ह्या यागासाठी वापरले गेले होते. ह्या यागाचे मंत्र पूर्ण शुद्ध व वैदिक होते आणि हे मंत्र श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजप्रणित होते.


कार्यक्रमविधी :

प्रथमदिन -  वेळ सकाळी ८.३० पासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत.

यजमान व ब्रम्हवृंदाकडून सकलजनांसाठी प्रायश्चित्त, सकलशांतिपाठ, समग्रप्रधानसंकल्प, श्रीब्रम्हणस्पतिपूजन, पुण्याहवाचन, सकलमातृकापूजन, आयुष्यमंत्रजप, नांदीश्राद्ध, श्रीवर्धिनीपूजन जलयात्रा व मंडपप्रवेश, कुंडस्थदेवता पूजन, मग आचार्यादि ऋत्विककरण, ऋत्विक म्हणजे यज्ञ करणारे त्या यज्ञाचे मंत्रोच्चार करणारे ब्रम्हवृंद त्यांना स्वतःची स्थापना करून घेतली. त्यानंतर श्री ब्रम्हणस्पतिसूक्ताचे अनुष्ठान प्रारंभ, वास्तूमंडल पूजन, योगीनिमंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, प्रधानमंडल स्थापना, ऐरणीमंथन अर्थात वैदिक पद्धतीने लाकडाच्या दोन यंत्रांच्या सहाय्याने घर्षण करून, मंथन करून पवित्र मंत्राच्या सहाय्याने अग्नी उत्पन्न केला गेला. नंतर नवग्रहमंडल पूजन, रुद्रमंडल स्थापना, मुख्यप्राण श्रीदत्तात्रेयांची प्राणप्रतिष्ठा, रुद्राभिषेक, ग्रहयज्ञ, श्रीदत्तमालामंत्राच्या ५४ वेळा पुरश्चरणाने याग करण्यात आला, स्थापितदेवतांचे सायंपूजन , नैवेद्य व आरती.
        
द्वितीय दिन - वेळ सकाळी ८.३० पासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत

यजमान व ब्रम्हवृंदाकडून शांतीपाठ, संकल्प, स्थापितदेवतापूजन, ब्रम्हणस्पतिसूक्त अनुष्ठान, मुख्यप्राण श्रीदत्तात्रेयांस पुरुषसूक्ताच्या सहस्त्रावर्तनाने अभिषेक, त्यानंतर चंदन व केशर ह्यांचे लेपन, पुरुषसूक्त यांद्वारे प्रधान यज्ञ, श्रीदत्तमालामंत्राच्या ५४ वेळा पुरश्चरणाने याग केला गेला. मग स्थापितदेवतांचे सायंपूजन, नैवेद्य अर्पण व आरती झाली.

तृतीय दिन - वेळ सकाळी ८.३० पासून संपेपर्यंत
           
यजमान व ब्रम्हवृंदाकडून शांतीपाठ, संकल्प, स्थापितदेवता पूजन व मुख्यप्राण श्रीदत्तात्रेयांस रुद्राभिषेक, मुख्यप्राण श्रीदत्तात्रेयांवर 'भोः दत्तगुरू' ह्या मंत्राने १०८ वेळा तुलसी-अर्चन, उत्तरांगहवन, बलिदान, पूर्णाहुति, महानैवेद्य, आरती, श्रेयोदान केले गेले. 

पुण्यफल :
पूर्णशुद्ध, उर्जायुक्त वैदिक मंत्रांनी हा दत्तयाग केला गेला होता. ह्यातून प्राप्त होणारे पुण्यफल प्रत्येक श्रद्धावानाला मिळालेले आहे. ह्या दत्तयागातून प्रत्येक श्रद्धावानाच्या शरीराला, मनाला, बुद्धीला व प्राणाला चतुर्विध अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त झालेले आहे. ही  अशी सुरक्षा पुढे येणाऱ्या काळासाठी सामुहिकरित्या, सामजिकदृष्ट्या व वैयक्तिकदृष्ट्याही तेवढीच महत्वाची व आवश्यक आहेत. 

तसेच ह्या दत्तयागाचे पुण्यफल म्हणजेच 'धन्य धन्य प्रदक्षिणा', विलक्षण प्रदक्षिणा अर्थात नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा, जी प्रत्येक श्रद्धावानाचे, त्याला ग्रासलेल्या रोगजंतूंपासून संरक्षण करणारी रोगप्रतिबंधक लस प्राप्त करून देणारी होती.

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध