• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Saturday, 10 January 2015

0

श्रीअवधूतचिंतन - संकल्पना

Posted in
अवधूतचिंतन, आशीर्वाद, दत्तात्रेय, गुरूदेव, दत्तगुरू, दत्तजयंती, श्री हरिगुरूग्राम, जोतिर्लिंग, कुंभयात्रा
Add caption
 ।।हरिओम।।  

परमेश्वराने माणसाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे हा नरजन्म. मागील जन्मांचे कितीही खडतर वाईट प्रारब्ध असूनही त्याने मला धडधाकट जन्माला घातले. सद्सद्विवेकबुद्धी दिली. जीवनात पुरुषार्थ करण्यासाठी शरीर दिले. खरंतर त्याने माझ्यावर एवढे ऋण करून ठेवले कि मी त्यातून उतराई होऊच शकत नाही. पण मग त्याने दिलेला जन्म आळसात, स्वार्थीपणात, मत्सरात, भयात, न्युनगंडात, नाकर्तेपणात, करंटेपणात घालविण्यात काय अर्थ आहे? पण अशा जीवन-मरणाच्या फेर्यातून सुटण्यासाठी नक्की काय करायचे, हेच आम्हाला कळले नाही, भक्ती कशी करायची, तेही कळले नाही. आमचे जीवन सुखी, समृद्ध, शांत, पुष्ट, तुष्ट, कसे करायचे, तेही कळले नाही. शेवटी त्या परमेश्वराला माझी दया आली कारण " तो असाच आहे". 'लाभेवीण प्रीति' हाच त्याचा स्वभाव आहे आणि म्हणून त्याने त्या परमात्म्याला, सद्गुरुतात्वाला जन्माला घातले. फक्त आणि फक्त माझ्या कल्याणासाठी, मला नव-अंकुर-ऐश्वर्या प्राप्त करून देण्यासाठी.


जमिनीतून जे आद्य वडाचे झाड उगवते, तो हा दत्तगुरू, परमेश्वर. त्याच्यातून जी एक फांदी बाजूला फुटते, ती म्हणजे आदिमाता - गायत्री - अनसूया - महिषासुरमर्दिनी. त्या फांदीतून जी पारंबी उगवते, ती पृथ्वीकडे यायला लागते. ती पारंबी म्हणजेच भगवान दत्तात्रेय आणि ती पारंबी ज्या क्षणी जमिनीला स्पर्श करते, तिला मुळे फुटतात आणि तिचा वृक्ष बनतो, तोच हा परमात्मा - महाविष्णू - परमशिव - सद्गुरुतत्व, त्या गायत्रीचा पुत्र.

आम्ही सामान्य माणसे आहोत. चुकतमाकत आयुष्य जगात असतो. काय भले, काय बुरे ह्याची नीट जाणीव नसते, दुःखाने, नैराश्याने, भीतीने, परिस्थितीने, चुकीने पिळवटले गेलेलो असतो. आयुष्यात येणाऱ्या संकटांनी, अडचणींनी, त्रासांनी कंटाळलेले, ग्रासलेले असतो. ह्या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी व्याकुळलेले, अधीर झालेले असतो. पण माझ्या पंखांत ह्यांतून बाहेर पडण्याचे बळ नसते. त्या पंखांना वेळोवेळी बळ देण्याचे काम हे सद्गुरुतत्व, काही गोष्टींचे संकल्प करून करीत असतो.
' उद्धरेत् आत्मना आत्मानम् । '
माझा उद्धार मला स्वतःलाच करायचा असतो. माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी मला स्वतःलाच आधी बदलावे लागते. पण त्यासाठी आवश्यकता असते माझ्या भक्तीची आणि सद्गुरुंच्या संकल्पाची व त्यातलाच एक संकल्प , म्हणजेच 'श्रीअवधूतचिंतन'.

 'श्रीअवधूतचिंतन' ही अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते. श्रीदत्तयाग, नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा, सर्वतोभद्र कुंभयात्रा व कैलाशभद्र महापूजन ह्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या म्हणजेच 'श्रीअवधूतचिंतन'.

एका विशिष्ट प्रेरणेने, विशिष्ट संख्येने व आवश्यक तेवढी स्पंदने पूर्ण झाल्यामुळे घडणारी ही घटना होती. १९९६ पासून प्रत्येक वर्षी एक ह्याप्रमाणे चार वर्षांत शिरडी, अक्कलकोट, आळंदी, शांतादुर्गा-मंगेशी येथे आयोजित केलेल्या चार रसयात्रा, त्याबरोबरीने धर्मचक्रस्थापना, मग २००१ सालची पंढरपूर भावयात्रा....ह्याच दरम्यान २००० साली झालेला व्यंकटेश उत्सव, २००३ सालचा जगन्नाथ उत्सव, २००४ सालचा गायत्री महोत्सव आणि मग २००७ साली गुरुक्षेत्रमची स्थापना असा हा प्रवास होता. दरम्यानच्या काळात २००७ साली परमपूज्य सद्गुरुंनी, येणाऱ्या खडतर काळाकरिता श्रद्धावानांना संरक्षक आध्यात्मिक कवच मिळावे ह्याकरिता दर गुरुवारी ‘आराधनाज्योती’ उपासनांची सुरुवात केली. ह्या आराधनाज्योती जशाजशा एका विशिष्ट क्रमाने पूर्ण होत गेल्या, त्यानंतरची ही आराधना होती. ह्यातून आपणां सर्वांसाठी एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण झाले आहे, जे पुढील काळासाठी सामूहिकरित्या, सामाजिकदृष्ट्या व वैयक्तिकदृष्ट्याही  तेवढेच महत्वाचे ठरत आहे. 

श्रीअवधूत दत्तात्रेयाचे २४ गुरु, ही ह्या विश्वामधील अशी २४ तत्वे आहेत, जी त्या महाविष्णूची - परमशिवाची - सद्गुरु दत्तात्रेयाची कृपा माणसाला मिळवून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

‘श्रीदत्तयागा’मधून शरीराला, मनाला, बुद्धीला आणि प्राणाला मिळालेले सुरक्षाकवच, 

ह्या उत्सवातील ‘नियतीचक्रपरिवर्तन प्रदक्षिणे’मधून माणसाच्या २४ चॅनेल्सवर २४ प्रक्रिया करून, जे चॅनेल्स आपल्याला दुःखदायक, क्लेशकारक ठरणारे असतात त्यांना ह्या प्रदक्षिणेच्या निदिध्यासातून शुद्ध करून देणारी रोगनिवारक लस, 

‘श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रा’ अर्थात सर्वतोपरी कल्याण करणारी यात्रा व 

‘श्रीद्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजन’ अर्थात बारा ज्योतिर्लिंगांचे महापूजन. 

ह्या उत्सवातून श्रद्धावानांना उपलब्ध असणाऱ्या ह्या चतुर्विध गोष्टी आपल्या सर्व प्रयासांना सद्गुरुतत्वाचे बळ प्राप्त करून देऊन आपले जीवन सुखी, समृद्ध, समाधानी, आनंदमयी करणाऱ्या चार पायऱ्या होत्या (चतुर्वर्ग उपासना).

।। श्रीअनिरुद्धार्पणमस्तु ।।
                                                                       
                                                                                                      -    - स्वप्नीलसिंह सुचितसिंह दत्तोपाध्ये

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध