• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Monday, 12 January 2015

0

'श्रीअवधूतचिंतन'

Posted in
अवधूतचिंतन, आशीर्वाद, दत्तात्रेय, गुरूदेव, दत्तगुरू, दत्तजयंती, श्री हरिगुरूग्राम, जोतिर्लिंग, कुंभयात्रा
'श्रीअवधूतचिंतन' ही परत परत घडणारी गोष्ट नव्हती. ती एका विशिष्ट वेळेला, विशिष्ट जपसंख्या पूर्ण होऊन निर्माण झालेली गोष्ट होती आणि तेवढेच नव्हे, तर लाभेवीण प्रेमळ असणाऱ्या अनिरुद्धांनी ती आपल्यासाठी खुली करून दिली होती. त्याने त्याचा अख्खाच्या अख्खा खजिना जणू आपल्या समोर ठेवला होता. आपले जीवन सुखी व्हावे, आपल्या जीवनात शांती असावी, आपले व आपल्या कुटुंबियांचे भले व्हावे, आपल्याकडे दुःखे नसावीत, अडीअडचणी नसाव्यात असे कोणाला वाटत नाही? खरेतर ह्याच गोष्टी करण्यासाठी आपण आयुष्यभर धडपड करत असतो. पण चांगले काय घ्यायचे, वाईट काय टाकायचे हेच कळत नाही. चांगले म्हणून वाईटाच्या मागे लागतो व खरे चांगले कधीच टाकून दिले, हे कळत नाही. आयुष्यभर फक्त दमछाक होत राहते. या देवाकडून त्या देवाकडे फक्त येरझाऱ्या घालत राहतो. एक गुरु, एक देव आणि एकच ग्रंथ यांच्यात आपण स्थिर होत नाही.


 हे घडू नये म्हणून त्या प्रेमळ सद्गुरुमाऊलीने, त्या कारुण्यघनाने - बापूने 'श्रीअवधूतचिंतना'चा अवर्णनीय खजिना आपल्यासमोर ठेवला. पाहिजे तेवढा लुटून न्या, हेच तो सांगत होता. मग आम्ही कशाला करंटे होऊ? खरेच, ज्याला जेवढा म्हणून जमला, तेवढा त्याने लुटून नेला. 

तो अनिरुद्ध आज आपल्याला मुक्त कंठाने ग्वाही देतोय की ‘तुमचे वाईट आहे ते मला द्या, तुमची पापे मी माझ्या डोक्यावर घ्यायला तयार आहे, मी तुमच्या जीवनाचे सोने करण्यासाठी सगळे काही करीन. तुमची घरे झाडेन, कपडे धुवेन, पाणी भरेन.’ म्हणजेच इथे अवधूत चिंतनाच्या माध्यमातून तो आपले सगळे लंगडेपण घ्यायला बसला होता. 

खरेच, कोण करेल का आपल्यासाठी एवढे? आपली सख्खी आई, वडील… करतील का आपल्यासाठी एवढे? मग हा का करतोय? खरेच त्याला आपला एवढा लळा का आहे? त्याचे आपल्यावर एवढे प्रेम का आहे की त्याच्यासाठी तो कुठल्याही थरापर्यंत जाऊन आपल्याला सुखी करूनच राहणार? सद्गुरुराया, खरेच रे, किती करतोस आमच्यासाठी? मग आम्ही तरी आता का मागे पडू? नाही बापुराया. आम्हीही तुझ्यावर एवढेच प्रेम करू, तुझ्यावर एवढा विश्वास ठेवू की पूर येवो की पाऊस, ऊन पडो की थंडी, आग लागो की धूर भरो; आमचा फक्त एकच, तो अनिरुद्ध!

ग्रंथ, गुरु सर्व काही एकच तो
अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध