ईशद् पृथ्क्कारिका
Posted in
Marathi
पृथ्क्कारिका द्वारातून बाहेर पडल्यावर बाहेर एक भली मोठी चाळणी ठेवलेली होती. तिचे नाव होते - ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी. ही चाळणी त्या परमकृपाळू अनिरुद्धांची आहे. ह्या चोवीस गुरूंचे पूजन करून झाल्यावर माझ्याकडे असलेल्या सुपामध्ये जे काही खडे, काड्याकुड्या शिल्लक राहणार होते, त्या मला ह्या अनिरुद्धाच्या चाळणीमध्ये टाकायच्या होत्या. माझे सूप ह्याच्या चाळणीत मला रिकामे करायचे होते.
तो माझ्यासाठी माझ्या सगळ्या काड्याकुड्या, खडे घ्यायला तयार आहे. माझी सगळी पापे घ्यायला तयार आहे. बापू म्हणतात, मी प्रेमाने तुमची हमाली करीन, तुमच्यासाठी झाडू मारीन, पाणीपण भरीन, तुमचे कपडेपण धुवीन, पण त्याच्यासाठी तुमचे माझ्यावर नितांत प्रेम असणे आवश्यक आहे. मला तुमच्याकडून दुसरे काहीच नको. फक्त तुमचे प्रेम मला द्या आणि तुमचे जीवन सुखमय, दुःखमुक्त, खेदमुक्त, रोगमुक्त झाले म्हणून समजाच.
अवधूत चिंतन उत्सव
'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध
0 comments: