• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Thursday, 8 January 2015

0

नियतीचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा

Posted in


नियतीचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा, समाधान, परिक्रमा, परिभ्रमण, शांतता, श्री हरिगुरूग्राम, अवधूतचिंतन

महत्व -
नियतीचक्रामध्ये प्रत्येक मनुष्य अडकलेला असतो. प्रत्येक माणसाची एक वेगळी नियती असते. ती त्याच्या देहाच्या प्रभामंडलाशी (ऑराशी) संबंधित असते. ज्याप्रमाणे प्रत्येकाची नियती वेगळी असते, तशीच त्याच्या संपूर्ण कुटुंबाची एक वेगळी नियती असते. तो ज्या चाळीत/सोसायटीत राहतो, त्या चाळीची/ सोसायटीची एक वेगळी नियती असते. तसेच ती चाळ/ सोसायटी ज्या गावात आहे, त्या गावाची एक वेगळी नियती असते. ते गाव ज्या राज्यात आहे, त्या राज्याची एक वेगळी नियती असते. पण तरीही स्व-नियतीच खूप बलवान असते. उदाहरणार्थ, एखाद्या बसला अपघात होतो व त्यामध्ये बसमधील सर्वजण मरण पावतात, पण एकच माणूस जिवंत राहतो. म्हणजेच त्या बसच्या नियतीनुसार तिला अपघात होणार होता; पण एका त्या माणसाच्या नियतीनुसार त्याला त्यावेळी मरण नव्ह्ते.

माझ्या स्व-नियतिचक्राचे परिवर्तन करून आणण्याची जबाबदारी, सामर्थ्य, क्षमता, कर्तृत्व माझ्यातच आहे. माझी नियती व त्यानंतर माझ्या आजूबाजूची परिस्थिती मी नक्कीच बदलू शकतो. मला माझ्या नियतीचक्राशी टक्कर देता येते; पण त्यासाठी माझा माझ्या देवावर प्रचंड विश्वास असावा लागतो. हे नियतीचक्र बदलण्याची ताकद मला ह्या प्रदक्षिणेने दिली. म्हणूनच तिचे नाव आहे 'नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा'.

दत्तात्रेय अवधूतांनी जे २४ गुरु केले, त्या चोवीस गुरूंची उपासना, पूजन आणि निदिध्यासन आपण ह्या प्रदक्षिणेत केले. दत्तात्रेय अवधूतांचे २४ गुरु म्हणजे ह्या विश्वातील अशी २४ तत्वे आहेत, जी मनुष्याला त्या महाविष्णूची, परमशिवाची, त्या सद्गुरूंची कृपा मिळवून देणारे २४ चानेल्स आहेत. पण हीच २४ तत्वे एका बाजूला नियतीशी बांधतात, मायेशी बांधतात, अज्ञानामध्ये अडकवितात, पापामध्ये, षडरिपुंमध्ये फसवतात, दुःखामध्ये लटकवतात; पण एकदा ही 'धन्य धन्य प्रदक्षिणा' पूर्ण झाली कि तीच २४ तत्वे आमच्यासाठी अज्ञानात ढकलणारी, दुःखात लोटणारी, मागे खेचणारी, यातना देणारी न ठरता शांती देणारी, तृप्ती देणारी, सुख देणारी ठरतात. तो दत्त आहे म्हणजेच देणारा आहे, देत असणारा आहे, देत राहणारा आहे, देत असणार आहे, दिला असलेला आहे. त्याच्यावरची गुरुभक्ती ही मिळवण्याची गोष्ट आहे आणि एकदा का ती गुरुभक्ती मनामध्ये रुजली की ती त्याची २४ तत्वे आमच्यासाठी सुख देणारी, शांती देणारी, तृप्ती देणारी, समाधान देणारी ठरतात. पहिल्यांदा ती दुर्बल करणारी असतात, पण गुरुतात्वांच्या प्रवेशानंतर ती सामर्थ्य देणारी होतात.

ज्या बेक्टेरीयांमुळे रोग होतो, टायफोईड होतो ते 'साल्मोनेला टायफी' किंवा ज्या व्हायरसमुळे पोलियो होतो ते पोलियो व्हायरस ह्यांच्यावर वैज्ञानिक शास्त्रज्ञ प्रयोग करतात व तेच व्हायरस/बेक्टेरीया माणसाच्या शरीरात टोचतात आणि मग ते रोग माणसाला ग्रासत नाहीत. ह्यालाच रोगप्रतिबंधक लस असे म्हणतात. इथे हीच गोष्ट घडली. जी २४ तत्वे माणसाचा घात करतात, त्या घातक तत्वांना एका विशिष्ट प्रक्रियेने, 'दत्तप्रक्रियेने', दत्ताच्या ह्या चॅनेल्सद्वारे २४ प्रक्रीयांमधून रुपांतरीत केले गेले. त्यांनाच 'व्हाक्सीन' किंवा 'लस' असे म्हणतात व ती लस टोचण्याची जागा म्हणजेच ही 'धन्य प्रदक्षिणा', विलक्षण प्रदक्षिणा किंवा नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा.

 ह्या प्रदक्षिणेमुळे, ह्या २४ गुरुतत्वांच्या उपासनेमुळे, पूजनामुळे, निदिध्यासामुळे रोगजंतूंचे रुपांतर लसीमध्ये झाले, बेक्टेरीयाचे रुपांतर व्हेक्सीनमध्ये झाले, अर्थात ज्याने रोग होतो, त्याचे रुपांतर रोनिवारणामध्ये झाले. ह्याचा अर्थ हाच की तो जो चॅनेल आहे, तो एकाच आहे, पण विरुद्ध दिशेने वापरला गेला कि जो आजपर्यंत अहितकारक, अपायकारक होता, तोच ह्या प्रदक्षिणेमुळे हितकारक, उपायकारक बनला. जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतातच. त्यातले चांगले कसे घ्यायचे व वाईट कसे टाकायचे, म्हणजेच आपल्या स्वतःच्या शरीराला, मनाला, प्राणाला, बुद्धीला आणि संपूर्ण जीवनाला रोगमुक्त, खेदमुक्त, दुःखमुक्त कसे करायचे, ह्याचा मार्ग म्हणजेच ही २४ गुरुतत्वांची प्रदक्षिणा अर्थात नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा.

ह्या प्रदक्षिणेची एकूण तीन अंगे होती.
         १) निर्वृत्तशूर्प (निर्वृत्तशूर्प) व्दार व पृथक्कारिका व्दार
         २) ईषद्पृथक्कारिका
         ३) दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु

वरील तीनही अंगांचा परत परत अभ्यास करणे, वाचन करणे, त्यावर चिंतन करणे, व त्याप्रमाणे आपल्या मनोबुद्धीत बदल घडवण्याचा सतत प्रयास करीत राहणे, हा ह्या प्रदक्षिणेचा एक भाग होता; तर ही 'धन्य धन्य प्रदक्षिणा' जमेल तेवढी जास्त वेळा करणे, त्या २४ गुरुतत्वांच्या प्रतीकांचे पूजन करणे, 'धन्य धन्य प्रदक्षिणे'च्या विलक्षण मार्गाने शरीराने, मनाने, बुद्धीने, व प्राणाने प्रवास करणे, हा ह्याचा दुसरा भाग होता.

ह्या प्रदक्षिणामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण ही प्रदक्षिणा करताना त्याच्या शरीराची हालचाल अशा पद्धतीने होत होती की प्रत्येकाच्या पाठीच्या मणक्यांच्या हालचालींच्या दिशेतून व रेषेतून ॐकाराची आकृती तयार झाली. म्हणजेच ही नियतीचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा घालताना प्रत्येकजण स्वतः स्वतःच्या कष्टाने, प्रयासाने ह्या २४ गुरुतत्वांच्या साक्षीने ॐकार तयार करीत होता हीच ह्या प्रदक्षिणेची गुरुकिल्ली होती. 

सुपामधील फुलांच्या पाकळ्या, बेलाची पाने व पत्री त्या २४ गुरुतत्त्वांच्या प्रतीकांवर वाहायच्या होत्या. ही प्रदक्षिणा करतानाच त्या २४ गुरुतत्त्वांच्या प्रतीकांची आराधना, पूजन व निदिध्यास करायचा होता. मग ह्याच  २४ गुरुतत्त्वांमुळे श्रद्धावानांच्या २४ चॅनेल्सना त्या सद्गुरुतत्त्वाची कृपा प्राप्त करून देण्याची संधी मिळणार होती.

ह्या सर्व २४ गुरुतत्त्वांचे पूजन केल्यावर दत्तात्रेय अवधूतांच्या प्रतिमेवर पंचामृत प्रोक्षण करण्यात आले. अतिशय सुंदर अशा ह्या अवधूतांच्या प्रतिमेसमोर त्यांच्या पादुका ठेवलेल्या होत्या. तिथेच ठेवलेल्या पळसाच्या काष्ठांनी ह्यांवर पंचामृताचे प्रोक्षण करण्यात आले. 

यानंतर सुपात शिल्लक राहिलेल्या काड्याकुड्या व खड्यांसकट ‘पृथक्कारिका’ द्वारातून बाहेर पडायचे होते. ह्या पृथ्क्कारिका द्वारातून बाहेर पडल्यावर परमपूज्य अनिरुद्धांची ही ‘इशद् पृथ्क्कारिका’ अर्थात् इष्ट करणारी जी चाळणी होती , त्यात श्रद्धावानाला ह्या काड्याकुड्या, खडे रिकामे करायच्या होत्या. पूर्ण विश्वासाने व दृढ भावाने ह्या सुपात गोळा केलेल्या काड्याकुड्या, खडे त्याला देऊन टाकायचे होते. त्यानेच त्याचे नियतिचक्र बदलण्याचा मार्ग त्याला गवसणार होता.

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध