• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Wednesday, 7 January 2015

0

दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु

Posted in
दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु, सकारात्मक ऊर्जा, अवधूत, महाविष्णु, श्री शंकर, दत्तगुरू, सुरक्षित मार्ग, श्री हरिगुरूग्राम, अवधूतचिंतन


दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत. ह्या 'धन्य धन्य प्रदक्षिणे' मध्ये आपण ह्या २४ गुरुतत्त्वांच्या प्रतीकांची प्रदक्षिणा, त्यांचे पूजन, निदिध्यासन केले व त्याच्यामुळेच ही २४ गुरुतत्त्वे २४ प्रक्रिया करून आपल्या २४ चॅनेल्सचे रुपांतर आपले जीवन सुखमय, आनंदमय बनवण्यासाठी रोगप्रतिबंधक लसीमध्ये करणार होती.


चॅनेल म्हणजे एक गोष्ट एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात safe (सुरक्षित) मार्ग. चॅनेल म्हणजे माहिती, साधनसामग्री व रसद निर्घोरपणे व निश्चितपणे जाण्याचा मार्ग अथवा कुठलीही प्रक्रिया 'अथ'पासून 'इति'पर्यंत पूर्ण होण्यासाठी क्रमाने होणाऱ्या प्रक्रिया अथवा माध्यम.

अवधूतांच्या प्रत्येक गुरूंचे स्वभावधर्म काय व त्यातून ’ग्राह्य’ म्हणजे घेण्यासारखे काय व ’त्याज्य’ म्हणजे टाकून देण्यासारखे काय, गुरुंच्या पूजनाने मनुष्याने काय घ्यायचे व काय टाकायचे ते शिकणे, त्याची उपासना करणे म्हणजेच नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा.

स्वभावधर्म  - त्या त्या गुरुचा स्वभावधर्म
ग्राह्य         -  घेण्याचे गुण
त्याज्य     -  टाकण्याचे गुण

ग्राह्य व त्याज्य ह्यांच्यात फक्त दिशेचा फरक आहे. प्रत्येक स्वभावधर्माची उचित दिशा म्हणजे गुणग्राहकाता अर्थात ग्राह्य गुण, तर  
प्रत्येक स्वभावधर्माची अनुचित दिशा म्हणजे दोष अर्थात त्याज्य गुण.

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध