'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.
ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.
ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले
विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.
दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.
Next
Previous
Saturday, 18 October 2014
ह्यामध्ये
बाराच्या बारा ज्योतिर्लिंगांचे पूजन श्रद्धावानांना करता आले. ही बारा
ज्योतिर्लिंगेसुद्धा एकूण २४ तत्वांमधून निर्माण झाली आहेत. बारा आदित्य व
अकरा रुद्र मिळून २३ तत्वे आहेत व त्यांचा प्रतिपाळ करणारा प्रजापती हे
२४वे तत्व. बारा आदित्य, म्हणजेच बारा सूर्य, तर अकरा रुद्र म्हणजे विघटन
करणार्या, प्रलय करणाऱ्या शक्ती आणि प्रजापती अर्थात प्रतिपाळ करणारा,
सांभाळणारा ही २४ तत्वे एकत्र आली. त्याच्यापासून स्त्री व पुरुष भेद झाले
आणि ही १२ ज्योतिर्लिंगे निर्माण झाली. ती ह्या २४ तत्वांची आराध्यदैवते
आहेत.
अशा ह्या महान
ज्योतिर्लिंगांचे पूजन केले गेले. ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग
कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य
ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना
करण्यास सांगितले आणि ज्या प्रथम पुरुषाला उपदेश केला, ते वसिष्ठ ऋषी.
त्यांना विष्णुउपासना करण्यास सांगितले. अशा ह्या बारा ज्योतिर्लिंगांचे
पूजन केल्याने श्रद्धावानाला त्याच्यातील वाईट गोष्टी, वासना, दुष्प्रवृत्तींचा विनाश, प्रलय
करण्यास व चांगल्या, शुभ, हितकारक गोष्टींचा प्रतिपाळ करण्याची संधी मिळाली. जीवनाचा
विकास करणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विकास करणे व वाईट गोष्टींचा लय करणे,
ही शिवशक्ती प्राप्त करण्याची संधी ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनाने श्रद्धावानांना मिळाली.
रचना:
ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनाची रचना
वर्तुळाकार होती. ह्याच्या मध्यभागी ताम्हणामध्ये एक नंदादीप सतत तेवत
होता. ह्यानंतरच्या प्रथम वर्तुळात ज्याला ‘प्रथम विक्रम’ म्हणतात,
त्यात गंगानदी, पंचमीची चंद्रकोर, डमरू, त्रिशूल व नाग ह्या शिवाच्या
आयुधांची चित्रे रेखाटली होती. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्तुळात,
ज्याला ‘द्वितीय विक्रम’ म्हणतात, त्यात ह्या बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना
केलेली होती.
ही बारा
ज्योतिर्लिंगे साधीसुधी नव्हती. ह्या रचनेत, आकारात, रंगात एक विलक्षणता
होती. ह्यातील पहिल्या ज्योतिर्लिंगाचा आकार करांगुलीप्रमाणाइतका म्हणजेच
करंगळीएवढा होता व त्याचा रंग पूर्ण काळा आहे. त्यानंतर ही ज्योतिर्लिंगे
क्रमाने वाढत गेली होती व सगळ्यात शेवटच्या ज्योतिर्लिंगाचा आकार हा
'पूर्णपाणि' म्हणजेच पूर्ण हाताएवढा होता. ‘पूर्ण हात’ खांद्यापासून सुरू होऊन
मधल्या बोटाच्या टोकाला येऊन संपतो. इतकी ह्या ज्योतिर्लिंगाची उंची होती व
त्याचा रंग करडा होता. ह्या ज्योतिर्लिंगाचा रंग काळा, स्फटिक व करडा ह्या
क्रमाने फिरत गेला होता. सगळ्यात शेवटच्या वर्तुळात, ज्याला ‘तृतीय विक्रम’
म्हणतात, त्यामध्ये रंगीत धान्याच्या प्रत्येक चौकोनावर एकेक मंगलकलश
ठेवलेला होता व ह्याचे जल सुगंध, कपूर, तुळस व सुपारीने युक्त होते. ह्या
पूर्ण रचनेत नंदादीपापर्यंत जाणारा एक प्रकाशमार्ग होता. जो श्रद्धावानाच्याही जीवाचा प्रकाशमार्ग होता. आतल्या आत्मज्योतीने श्रद्धावानाचे जीवनही ह्या ज्योतीने
देदीप्यमान, प्रकाशमान होऊन उजळून निघण्याची संधी मिळाली होती. पूजनाच्या मंत्राच्या वेळेस श्रद्धावानांना दिलेल्या पांढऱ्या फुलांनी, बेलाच्या पानांनी व पत्रींनी म्हणजेच
तेरडा, आगाडा, जास्वंद, पारिजातक, औदुंबर व पळस ह्या पानांनी त्यांनी
ज्योतिर्लिंगाचे पूजन केले.
ह्या नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणेमध्ये व ह्या ज्योतिर्लिंग पूजनात
आपण जी पत्री वापरली, ती साधीसुधी वा केवळ सुवासिक फुलांची पाने नव्हती; तर शंकराला ह्याच पत्रीची का आवड होती, ह्याची एक सुंदर गोष्ट आहे. शिवाच्या पत्नीचे - पार्वतीचे एक नाव ‘अपर्णा’.
शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी तिने अतिशय घोर उपासना केली व ह्या उपासनेत
खंड पडू नये म्हणून ती जागेवरून जराही उठली नाही. यादरम्यान झाडावरून जी
पाने खाली पडायची, ती खाऊन तिने ही उपासना केली. शेवटी शेवटी तर ह्या
झाडांना एकही पर्ण (पान) शिल्लक राहिले नाही, तेव्हा ‘अ - पर्णा’ म्हणजे एकाही पानाचे
सेवन न करता उपासना केली व शिवाला प्राप्त करून घेतले आणि म्हणूनच शिवाला
फक्त हीच पाने प्रिय आहेत; कारण ह्या पानांनीच त्याच्या प्रियेच्या
जीविताचे रक्षण केले.
ह्या महापूजनामध्ये
१. शिवयोगसागर मंत्रविधान
२. शिवयोगदर्पण ध्यान
३. डिंडिम आरती
हा क्रम होता.
पुण्यफल -
शिव - जो लय करतो, प्रलय करतो, विघटन करतो तो ‘शिव’. ह्या
श्रीज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनाने श्रद्धावानांनी आपल्यातील वाईट गोष्टी, षड्रिपु,
आळस, दुर्गुण, कुबुद्धीचा नाश करण्याची विनंती त्या शंकराला, रुद्राला
केली व आपल्यातील चांगल्या गुणांची वृद्धी, शुभदायी, आनंददायी
गोष्टींचा प्रतिपाळ करण्याची मागणी त्याला केली.
* ह्या महापूजनाने श्रद्धावानाच्या सर्व प्रकारच्या शत्रूंचे बळ क्षीण होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अवधूत चिंतन उत्सव
'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध
0 comments: