• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Friday, 8 August 2014

0

शुभारंभ

Posted in


अवधूतचिंतन, आशीर्वाद, दत्तात्रेय, गुरूदेव, दत्तगुरू, दत्तजयंती, श्री हरिगुरूग्राम, जोतिर्लिंग, कुंभयात्रा

 ।।हरि ओम।।
दत्त येऊनिया उभा ठाकला
'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त.  
भारतीय संस्कृतीमध्ये अवधूत हा स्थितप्रज्ञ सिद्धपुरुष असतो. हा दिगंबर म्हणजे दिशांचे वस्त्र पांघरणारा असतो. योगसाधना, तपश्चर्या व सहजध्यान अशा त्रिविध अंतर्मुख कार्यात अवधूत सदैव निमग्न असतो. असे अनेक अवधूत होऊन गेले - परंतु माझा दत्तात्रेय हा एकमेव अव्दितीय परमश्रेष्ठ अवधूत अर्थात ब्रम्हपुरुष.

अवधूत उपनिषदामध्ये 'अवधूत' नामाचे ध्यान खूपच सुंदरपणे केले आहे.
'अ' - 'अ' म्हणजे अक्षरत्व' - हा अवधूत 

"अ" - क्षर अर्थात नित्य आहे - साक्षात अक्षरब्रम्ह आहे.आणि कार्यशील सिद्ध आहे कारण अक्षरत्व ह्याचा एक अर्थ 'कार्यस्थिती' हा आहे.
"व" - व म्हणजे वरण्यत्व' अर्थात श्रेयसाची, श्रेष्ठत्वाची परिसीमा आणि पूर्णत्वाची पराकाष्ठा.
"धू" - धू म्हणजे बंधनमुक्त आणि धुतलेला अर्थात पूर्णशुद्ध'.
"त" - 'तत् त्वम् असि' ह्या आत्मज्ञानाच्या महावाक्याचे आद्य व अंतिम स्वरूप म्हणजे 'त' - अर्थात 'त म्हणजे निर्गुणाची ओळख करून देणारे सगुणत्व'.
  
ह्या माझ्या अवधूताच्या सहजचिंतनातून त्याचे चोवीस गुरु प्रकाशित झाले - त्या दत्तात्रेयाच्या त्याला स्वतःपेक्षाही प्रिय असणा-या लाडक्या श्रद्धावानांसाठी.

सर्वश्रेष्ठ आद्य गायत्रीमंत्रातील चोवीस अक्षरांतूनच ही चोवीस गुरुतत्वे प्रवाहित झाली आणि माझ्या अवधूताच्या करुणामयी चिंतनातून ती स्थूल रुपात प्रगटली.

मानवाच्या निर्मितीसाठी आणि पुनरुत्थानासाठी, खरं तर अवघ्या मानवजन्मासाठीच आवश्यक व कार्यरत असतात, त्या गुणसूत्रांच्या (क्रोमोझोम्स chromosomes) २३ जोड्या. ह्या २३ जोड्या अर्थात ४६ गुणसूत्रे मातेकडेही असतात व पित्याकडेही असतात. त्या मात्यापित्यांच्यापासून त्यांचे अपत्य बनताना मातेच्याकडून २३ व पित्याकडून २३ गुणसूत्रे एकत्र येतात व परत एकदा ४६ गुणसूत्रांचा 'नरदेह' तयार होतो.

त्या अपत्याने मातेकडून २३ चॅनल्स (तळटीप) स्वीकारलेली असतात, घेतलेली असतात आणि पित्याकडूनही फक्त २३च. अर्थात नरजन्मास येतानाच मातेकडून व पित्याकडून प्रत्येकी २३ 'ग्राह्य' गोष्टी (आलेली गुणसूत्रे) व २३ 'त्याज्य' गोष्टी (न आणलेली गुणसूत्रे) ह्यांची ओळख झालेली असते व त्यातूनच २४वा गुरु अर्थात 'नरदेह' अर्थात श्रेष्ठ गुरु निर्माण झालेला असतो.

मानवी जन्ममृत्यूच्या अर्थात अनेक जन्मांच्या शृंखलेमध्ये सुखप्राप्ती व दुःखनिवृत्ती, पुरुषार्थ व भयनिवृत्ती, परमात्मप्राप्ती व प्रारब्धनाश प्राप्त करून घ्यायचे असतील, तर ह्या अवधूतचिंतनातील २४ गुरुंच्या ग्राह्य काय किवा त्याज्य काय, हे जाणून घेऊन तसे करणे हेच सर्वश्रेष्ठ मार्गदर्शन आहे.

माझ्या लाडक्या मित्रांनो, माझ्या अवधूताने माझ्या गायत्रीमातेची ही २४ अक्षरे गुरुतत्त्वरूपात माझ्या मनावर कोरली व मन ह्या २४ तत्वांनी पूर्णपणे भरून गेले. तुम्हा सर्वांनाही हे 'अवधूतचिंतन' असेच वेड लावो, हीच माझी इच्छा.

तळटीप : चॅनेल म्हणजे माहिती, साधनसामग्री, रसद निर्घोरपणे व निश्चितपणे जाण्याचा मार्ग किंवा कुठलीही प्रक्रिया अथपासून इतिपर्यंत पूर्ण होण्यासाठी क्रमाने येणाऱ्या प्रक्रिया व माध्यमे.
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु।।
                                 
                                                       - डॉ. अनिरुद्ध धै. जोशी

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध